Shocking Video; बस मधून उतरली आणि पाण्यात वाहून गेली थरारक वीडियो

Shocking Video: न्यूयॉर्क शहरात मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून त्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भरधाव पाण्याच्या प्रवाहात बसमधून उतरलेली एक महिला वाहून गेल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. Shocking Video

व्हायरल झालेल्या १५ सेकंदांच्या क्लिपमध्ये एक महिला बसमधून खाली उतरताना दिसते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे बस चालकाला बस थेट फुटपाथजवळ थांबवता आली नाही. महिला खाली उतरताच जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे तिचा तोल गेला आणि ती पाण्यात वाहून गेली. Shocking Video आजूबाजूचे लोक तिला वाचवण्यासाठी धाव घेताना देखील व्हिडीओत दिसत आहेत.  

न्यूयॉर्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. काही भागांमध्ये ड्रेनेज सिस्टम पूर्णपणे निकामी झाल्याने पूराचे पाणी वेगाने रस्त्यांवर आले. Shocking Video


हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी बस चालकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. “बस आणखी जवळ थांबवता आली असती,” अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. तर काहींनी न्यूयॉर्कच्या पायाभूत सुविधांवरही टीका केली आहे.  

दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  

Leave a Comment