crossorigin="anonymous"> Ladaki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांची यादी जाहीर - MS UDYOJAK

Ladaki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांची यादी जाहीर

Ladaki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता अपात्र महिलांची संख्या 9 लाखांवरती गेलेली आहे. मित्रांनो सरकारकडून नियमावलीच्या आधारे 5 लाख महिलांना काही दिवसा अगोदर या योजनेमधून अपात्र महिलांना बाद करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखीन चार लाख महिला या योजनेमधून अपात्र होण्याची वेळ आली आहे. व सरकारने 7 लाखाचा अपात्र महिलांचा आकडा अधिकृतपणे जाहीर देखील केलेला आहे. त्यामुळे आता अजून किती महिला अपात्र आहेत त्यांच्याकडे लक्ष दिले जाणार आहे, व कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा हे ठरवले जाणार आहे….!

या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही..!Ladaki Bahin Yojana Update

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र महिलांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना अर्जाच्या छाननीचे आदेश देखील दिलेले आहेत. आणि अर्जाची छाननी प्रक्रिया देखील मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये पाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता हा 2 कोटी 41 लाख महिलांनाच मिळाला होता. आणि आता आणखीन 2 लाख 30 हजार महिलांना या योजनेतून अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे काही महिला या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे, व काही महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त होते त्यामुळे या महिला देखील आता या योजनेतून अपात्र होणार आहेत. Ladaki Bahin Yojana Update

लाडकी बहिणी योजनेत इ केवायसी प्रक्रिया करणे गरजेचे..!Ladaki Bahin Yojana E-Kyc

आता पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच लाडकी बहिण योजनेअंतर्गत देखील आता आपल्याला केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभाचा गैरफायदा घेणाऱ्या देखील भरपूर महिला आहेत. त्यामुळे सरकारकडून नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये आता या योजनेसाठी महिलांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. लाडकी बहिण योजनेमध्ये आतापर्यंत ज्या महिला पात्र आहेत त्यांना 2 जून ते 1 जुलै या दरम्यान ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या योजनेतील सुमारे 16 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले होते. पण त्यांच्या बँक खात्यात ते पैसे जमा झालेले नाहीयेत. त्यामुळे आता फेर तपासणी सुरू होणार आहे, व ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न नसेल त्यांना संलग्न करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.Ladaki Bahin Yojana Update

Leave a Comment