crossorigin="anonymous"> Board Exams : बोर्ड विभागाकडून अचानक मोठा निर्णय - MS UDYOJAK

Board Exams : बोर्ड विभागाकडून अचानक मोठा निर्णय

Board Exams: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या सर्वत्र ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एच एस सी बोर्ड परीक्षा चालू आहेत. त्यादरम्यान आज गणिताचा पेपर झाला व बोर्ड विभागाने नवीन निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय कोणता आहे याबाबत सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आज 22 फेब्रुवारी 2025 रोजी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपर पूर्ण झाला व बोर्ड विभागाने एक नवीन निर्णय जारी केलेला आहे.

मित्रांनो राज्यभरामधे दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना अनेक ठिकाणी आपल्याला गैरप्रकार होताना पाहायला मिळत आहेत. तसेच बारावी बोर्डचा फिजिक्स चा पेपर हा गोंदिया जिल्ह्यामध्ये फुटला होता त्यानंतर पालकांनी संतप्त व्यक्त केला होता. दहावीच्या परीक्षा देखील सुरू आहेत तसेच दहावीचा मराठीचा पेपर देखील पहिल्याच दिवशी फुटला होता. तीन ठिकाणी हा पेपर फुटला होता. त्यामुळे पालकांचा संताप आणखीन वाढलेला आहे. आता बोर्डाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. Board Exams

बोर्ड विभागाचा नवीन निर्णय..?

मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यांचा आज गणिताचा पेपर झाला आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे बोर्ड भागाकडून कॉमर्सचे त्याचप्रमाणे विज्ञान शाखेच्या बायोलॉजी या विषयाचे पेपर बाकी असल्यामुळे आता प्रत्येक परीक्षा केंद्र वर सरमिसळ पद्धत सुरू होणार आहे. बैठे पथक, भरारी पथक यांची संख्या देखील वाढणार आहे. परीक्षा केंद्र बाहेर ड्रोन कॅमेरा हे देखील लागणार आहे. तसेच विशेष करून शिक्षकांची नेमणूक देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे असे गैरप्रकार घडणार नाहीत. Board Exams

काय म्हणाले शरद गोसावी? Board Exams

यावेळी शरद गोसावी यांनी बोलताना असं सांगितलं की पेपर फुटी या प्रकरणाचा मी पूर्णपणे खंडन करतो. शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, जालना. संबंधित ज्या शाळेमध्ये पेपर फुटला असं दाखवलं जाते तिथे जे पेपर वायरल झाले आहेत. त्याचा आणि प्रश्नपत्रिकाचा काहीही एक संबंध नसल्याने गोसावी यांनी सांगितले आहे. पुन्हा ते असे देखील म्हणाले की संबंधित कर्मचाऱ्यांनी मला ती पाने देखील पाठवले आहेत. त्या पानांचा आणि प्रश्न पत्रिकेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. असे देखील प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याबद्दल अधिक माहिती तसेच रिपोर्ट आम्ही घेत आहोत. असे देखील गोसावी म्हणाले व त्या प्रकरणाचं खंडन आणि पेपर फुटला नसल्याचा दावा त्यांनी केला.

Leave a Comment