छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी Loan Scheme In 2026 | प्रधानमंत्री स्वनिधी योजना
नमस्कार मित्रांनो, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमीच मोठ्या भांडवलाची गरज असते असे नाही. योग्य वेळी मिळालेली थोडी आर्थिक मदतही अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. अशाच छोट्या व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने Loan Scheme In 2026 अंतर्गत योजना सुरू केली आहे.
ही योजना प्रामुख्याने शहरी भागातील रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोज कमावून रोजचा खर्च भागवणाऱ्या व्यावसायिकांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अशा व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करणे.
किती कर्ज मिळते?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत लाभार्थ्यांना एकरकमी कर्ज न देता ते तीन टप्प्यांत दिले जाते.
- पहिला टप्पा: ₹10,000
- दुसरा टप्पा: पहिल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यानंतर ₹30,000
- तिसरा टप्पा: सर्व नियमांचे पालन केल्यास ₹50,000
अशा प्रकारे एकूण ₹90,000 पर्यंत कर्जाची सुविधा मिळू शकते.
व्याज सवलत आणि कॅशबॅक
या Loan Scheme In 2026 अंतर्गत वेळेवर EMI भरणाऱ्या लाभार्थ्यांना ७% पर्यंत व्याज सवलत दिली जाते. ही सवलतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
याशिवाय, डिजिटल पेमेंटचा वापर केल्यास दरमहा कॅशबॅकचा लाभ देखील मिळतो.
अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र लाभार्थी ऑनलाइन किंवा संबंधित बँकेमार्फत अर्ज करू शकतात.
👉 येथे बघा अर्ज कसा करायचा (https://pmsvanidhi.mohua.gov.in/Home/ApplyLoan)