Tushar Sinchan Farming Schemes: नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत देश कृषी प्रधान देश आहे. या देशामध्ये सरकारच्या द्वारे खूप साऱ्या योजना चालवल्या जातात. भारत देशात शेती ही जास्त प्रमाणात केली जाते. या कारणाने सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. यामधील आज आपण तुषार सिंचन योजनेबद्दल बोलणार आहोत. तुषार सिंचन योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहे. तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.
मित्रांनो शेतकऱ्यांच्या पाण्याची बचत व्हावी यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत असते. कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कशाप्रकारे देता येईल. यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत असते. परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शेती करायची असेल. तर तुम्हाला सरकारच्या एका नवीन योजनांबाबत माहिती असणे खूपच गरजेचे आहे. कारण की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक महिन्याला नवीन नवीन योजना घेऊन येत असते. याचा लाभ महाराष्ट्रातील तसेच इतर जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील शेतकऱ्यांना देखील होत असतो. आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुषार सिंचन योजना बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून सांगणार आहोत.
मित्रांनो तुषार सिंचन ही पावसाचे अनुकूलन करून पिकांना पाणी देण्यासाठी खूपच लोकप्रिय पद्धत आहे. पावसासारखेच पाणी आपण आपल्या पिकाला तुषार सिंचना द्वारे देऊ शकतो. या तंत्रामध्ये स्प्रिंकलर हेड असलेल्या पाईप द्वारे झाडांना पाणी देऊ शकतो. जे कृषी क्षेत्रावर पाणी फवारण्यास मदत होते. तुषार सिंचनाचे शेतीमध्ये अनेक उपयोग तसेच फायदे देखील आहेत.
त्यामुळे हे एक सक्षम आणि प्रभावी सिंचन बनते. या लेखात आपण स्प्रिंकलर सिंचनाचे पद्धत व उपयोग पाहणार आहोत. तसेच याचा लाभ तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता. हे देखील आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो तुषार सिंचन पद्धतीचे प्रकार आणि शेतकरी एकूण कृषी उद्योगाला होणारे फायदे याची माहिती पाहूया.
तुषार सिंचन पद्धतीचे फायदे (Tushar Sinchan Farming Schemes Benefits)
शेतकरी मित्रांनो तुषार सिंचन चे खूप सारे फायदे आहेत. जसे की कृषि पद्धत मध्ये पीक सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करताना देखील आपल्याला पाहायला मिळते. हे पिकांवर पाण्याचे नियंत्रण आणि एकसमान वितरण प्रदान करताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यामुळे वनस्पतींच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आपल्याला ओलावा गरजेचे असतो. तो ओलावा स्प्रिंकलरच्या माध्यमातून आपण पाणी सोडून कमी पद्धतीने पाणी सोडून पिकांमध्ये सारखा ओलावा ठेवू शकतो. जेणेकरून आपली पिके जळणार नाहीत. व पिके वाढीस चांगली मदत होते. व पिकांचे पाण्याचे नियंत्रण देखील एक समान राहते.
फळबागेसाठी तुषार सिंचन (Tushar Sinchan Farming Schemes)
सिंचन भाजीपाला पिक सिंचन यामध्ये विविध प्रकारचे सिंचन आपल्याला लावता येतात. परंतु मित्रांनो आपण जर फळबागा विषयी माहिती घेतली तर. आपण सिंचनाचा वापर करू शकतो वेलीला पाणीपुरवठा करण्यासाठी त्याच्या विशिष्ट गरजांसाठी आपण याचा वापर करू शकतो. स्प्रिंकलर झाडाच्या थोडा जास्त वरती गेल्यानंतर त्याद्वारे आपण विविध प्रकारचे औषध तसेच पाणी देखील सोडू शकतो. यासाठी तुम्हाला जास्त पाण्याची गरज देखील लागणार नाही. तुम्ही कमी पाण्यामध्ये आपले पिक वाढवू शकता. तसेच चांगल्या प्रकारे शेती तुषार सिंचन द्वारे केली जाऊ शकते. यामुळे तुषार सिंचन आज काल खूप गरजेचे आहे.
भाजीपाला साठी तुषार सिंचन वापर (Tushar Sinchan Farming Schemes)
मित्रांनो, भाजीपाला पिकवण्यासाठी देखील तुम्ही तुषार सिंचन चा वापर करू शकतात.जसे की कोथिंबीर, टोमॅटो,वांगे, ढोबळी मिरची, तसेच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांना सिंचन करण्यासाठी स्प्रिंकलर खूपच योग्य आहे. वेगवेगळ्या भाज्यांची पाण्याची गरज देखील तुम्ही भागवू शकतात. तसेच निरोगी वाढ आणि उच्च उत्पादन करण्यास तुम्हाला या सिस्टमची गरज लागू शकते. त्यामुळे तुम्हाला जर सिंचन लावायचे असेल तर तुम्ही देखील कोणत्याही योजनेच्या मार्फत यासाठी अर्ज करून तुषार सिंचन आपल्या रानामध्ये बसवू शकतात.
नर्सरी किंवा रोपवाटिकेसाठी तुषार सिंचन वापर कसा करावा
शेतकरी मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही रोपवाटिका आणि हरितगृह सिंचन देखील वापरू शकता. जसे की रोपे आणि कुंडीतील रोपांना पाणी देण्यासाठी त्याच्यावरती पाणी शिपडण्यासाठी तुषार सिंचन चा वापर करू शकता. तसेच पाण्याची नियंत्रण देखील करू शकता. आपल्याला जर नर्सरी टाकायची असेल तर त्यामध्ये देखील स्प्रिंकलरचा म्हणजेच या तुषार सिंचन चा मोठ्या प्रमाणात वापर करताना पाहायला मिळत असतो. तसेच आपण देखील तुषार सिंचनाचा वापर करू शकता.
तुषार सिंचन करण्याचे फायदे..? (Tushar Sinchan Farming Schemes Benefits)
आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुषार सिंचन करण्याचे खूप सारे फायदे आहेत. जसे की पाण्याची कार्यक्षमता तुषार सिंचन व इतर सिंचनाच्या पद्धतीच्या तुलनेत खूपच अपव्य कमी करून पाणी पुरवण्यासाठी आपल्याला अनुमती देते. तसेच नियंत्रण फवारणी पॅटर्न प्रवाह कमी करते. आणि लक्षणीय किंवा झाडांपर्यंत पाणी पोहोचते याची संपूर्ण माहिती सांगितली आहे. स्प्रिंकलर करण्याच्या माध्यमातून तुम्हाला जास्त पाण्याची गरज नाही. अगदी थोड्या प्रमाणात पाणी जर असेल तरी देखील तुम्ही तुषार सिंचन चा वापर करून मोठ्या प्रमाणात पाणी वाचवू शकता.
शेतकरी मित्रांनो वेळेची ही बचत तुम्हाला यामध्ये पाहायला मिळते. तुषार सिंचन प्रणाली मोठ्या पिकांना जास्त पाणी देण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही जर एकदा स्प्रिंकलर चालू केले म्हणजे तुषार सिंचन चालू केले तर तुम्हाला तिथे थांबण्याची गरज नाही. ते ऑटोमॅटिक पिकांना पाणी देण्यास मदत करते. व सर्व पिके योग्यरित्या ओली होतात. व त्यांना पाण्याची जास्त गरज देखील लागत नाही. सारखा ओलावा असल्याकारणाने पिके देखील चांगली येतात.
पिकांच्या गरजांवर आधारित पाणी जर आपण वितरण केले तर समयोजित कालावधीसाठी हे पिके लवचिक होतात. हे एकसमान कवर करते. आणि प्रत्येक रोपाला समान पद्धतीचे पाणी देखील मिळते. आणि याद्वारे पिकांची वाढ आणि जास्त प्रमाणात उत्पन्न देखील मिळू शकते. तुम्हाला देखील आपल्या रानामध्ये तुषार सिंचन बसवायचे असेल तर तुम्ही देखील तुषार सिंचन वापर करू शकता.
तुषार सिंचन द्वारे खाते औषधे सोडण्यास उपयुक्त (Tushar sinchan For fertilizer)
मित्रांनो औषध फवारणीसाठी तसेच पाण्यासाठी तुम्ही सिंचना सोबत एकाच वेळी पिकांना खते तसेच इतर पोषक द्रव्य तत्वे देऊ शकतात. ही पद्धत फर्टिगेशन म्हणून देखील ओळख केली जाते. पोशिकतेचे सेवन वाढते. आणि निरोगी देखील आपली पिके राहतात. पिकांना कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही. या कारणाने खूप सारे शेतकरी तुषार सिंचन चा वापर करतात व पिकांना थेट पद्धतीने औषध व खते एकाच वेळी देऊ शकतात. म्हणजेच सोडू शकतात यासाठी तुम्हाला हाताने खते टाकण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट स्प्रिंकलरच्या माध्यमातून ही खते झाडांपर्यंत पोहोचवू शकता.
शेतकरी मित्रांनो तुषार सिंचन केल्यामुळे पिकांना अनेक सारे फायदे होतात शेतीमध्ये अनेक उपयुक्त फायदे देखील आपल्याला होतात. फळे फळभाज्या फळबागा तसेच रोपवाटिका आणि हरितगृहांना पाणी पोहोचण्याची ही एक खूपच लोकप्रिय पद्धत आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही पिकांना चांगल्या प्रमाणात व सर्व पिकांना एकसारखे पाणी स्प्रिंककलर सिंचन मार्फत देऊ शकता. शेतकऱ्यांना त्यांचा विशिष्ट गरजांसाठी योग्य तो पर्याय निवडून योग्य ते सिंचन खरेदी करू शकतात.
आपल्या रानात किंवा इतर नर्सरीमध्ये देखील याचा वापर करू शकतात. दव पासून देखील आपण सौरक्षण करूनाहकती म्हणजे मित्रांनो थंडीपासून देखील आपण या पिकांना वाचवू शकतो. मातीची धूप देखील जास्त प्रमाणात कमी करू शकतात. आधुनिक कृषी पद्धतीमध्ये हे एक मौल्यवान साधन आपल्याला लोकप्रिय झालेले दिसत आहे. आणि खूप सारे उत्पादक शेतकरी शेतीसाठी तुषार सिंचनाचा वापर करतात. यासाठी सरकारने योजना देखील राबवली आहे. ज्या शेतकऱ्यांना स्प्रिंकलर म्हणजे तुषार सिंचन हवे आहे ते शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
तुषार सिंचन योजना 2023 काय आहे..?
शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी सध्या तुषार सिंचनाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याद्वारे अनुदान देखील दिले जाते. परंतु शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना अजूनही सरकारच्या या अनुदानासाठी योजनेचा लाभ घेता आला नाही ही बातमी त्या शेतकऱ्यांसाठी खूपच खास आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. तुम्ही महाडीबीटीच्या पोर्टलवर जाऊन अर्ज देखील ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. असे आवाहन सरकारच्या कृषी विभागाकडून आपल्याला देण्यात येत आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करू शकतो. याची माहिती देखील आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण देणार आहोत.
तुषार सिंचनाच्या मार्फत शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाते..?
तुषार सिंचन करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब एक पीक असे सूक्ष्म सिंचन योजनेच्या प्रकल्पासाठी नाव देण्यात आले आहे. भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% तसेच अन्य भूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. अनुसूचित जाती तसेच जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांति योजनेत 35 ते 45% अनुदान दिले जाणार आहे.
मात्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वरती मिळणाऱ्या अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना अर्जाचे प्रमाण कमी असल्याने क्षेत्रीय स्तरावर या योजनेच्या माध्यमातून मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अशी विनंती कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. तुम्ही देखील ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करू शकता. आपला देखील अर्ज मंजूर झाल्यानंतर तुषार सिंचन प्राप्त करू शकता.
तुषार सिंचन योजना अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे..? (Tushar Sinchan Farming Schemes Document For Apply)
शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.(IMP Documents) अर्ज करण्यासाठी ती तुम्हाला खालील प्रमाणे यादीत दिलेली आहेत ती तुम्ही पहा.
- सातबारा उतारा 8अ
- बँकेचे पासबुक झेरॉक्स
- आधार कार्ड
- आधार कार्ड सोबत बँक लिंक असणे आवश्यक
- अर्जदार शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी. व त्याची नोंद सातबारा वरती असावी.
- तुमची नोंद जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे शेततळे किंवा विहीर स्वयंघोषण पत्र असावे.
शेतकरी मित्रांनो वर दिलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत. ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही देखील तुषार सिंचन योजनेचा लाभ घेऊ शकता.
तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज कुठे करावा..? (Tushar Sinchan Farming Schemes Form Fill)
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login संकेतस्थळावरती जावे
- त्यानंतर त्या ठिकाणी लॉगिन करा
- तुम्ही आधी कधी पण हे register केलं असेल तर त्या ठिकाणी आयडी व पासवर्ड टाका
- किंवा नवीन असाल तर Rigister वर क्लिक करा
- नंतर कृषी सिंचन… दिसेल त्यावर क्लिक करा.
- परत Home Page वरती परत जाऊन त्या ठिकाणी Apply वर क्लिक करा.
- नंतर पुढे जाण्यासाठी irritation Select Items on Tools And Facalities वर क्लिक करून पुढे जा.
- तिथे तुम्हा बरीच माहिती विचारली जाईल ती पूर्ण माहिती अचूक पणे त्याठिकाणी भरा.
- सर्व झाल्यावर Payment पर्यायावर क्लिक करा तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज साठी 23 रुपये ऑनलाईन पद्धतीने द्यावे लागतील त्यांनतर तुमचा अर्ज यशिस्विरीत्या भरला जाईल
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या कृषी विभागातील कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी कार्यालयाला भेट द्यावी व संपर्क करावा. शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जातून संगणकीय सोडत काढण्यात येईल व निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना देखील आपल्या मोबाईल वरती एक एसएमएस येईल फोन नंबर द्वारे. व कळविण्यात येईल की आपण या योजनेसाठी पात्र आहात. तुषार सिंचन बसवल्यानंतर कृषी परिवेक्ष मार्ग तपासणी होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हास्तरावरून अनुदान जमा करण्यात येईल. असे कृषी विभागाने सर्व माहिती दिली आहे.