Satbara Utara Online: नमस्कार मित्रांनो आपल्याला कधी सातबारा उताऱ्याची गरज लागेल, हे सांगता येत नाही. मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल द्वारे सातबारा डाऊनलोड किंवा कशाप्रकारे पाहू शकतात. आजच्या बातमीच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्याकडे सातबारा असणे ही एक काळाची गरज आहे. मित्रांनो आपली जमीन जर आपल्या नावावर असेल तर आपल्याकडे गट नंबर आणि सातबारा हा असायला हवा. कारण शेतकऱ्यांची त्याच्या शेजाऱ्या बरोबर सारखी बांधावरून भांडण होत असतात. या कारणामुळे शेतकऱ्यांकडे सातबारा असणे खूपच गरजेचे आहे.
खूप शेतकरी हे त्यांच्या सातबारा वरील जमिनीपेक्षा जास्त जमीन अतिक्रमणामध्ये घेऊन ठेवतात. यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याचे नुकसान होते. यामुळे वाद विवाद निर्माण होतात. या कारणामुळे आपल्याकडे सातबारा असणे गरजेचे आहे. परंतु आपल्याकडे किती जमीन आहे. याची माहिती देखील आपण सातबारा द्वारे खात्री करून वादविवाद जे होतात ते मिटवू शकतो. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन सातबारा कशाप्रकारे डाऊनलोड करू शकतात हे बघणार आहोत.
सातबारा म्हणजे काय..?
मित्रांनो अनेक शहरातील किंवा गावातील तरुणांना माहीत नसेल की सातबारा म्हणजे काय. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की सातबारा हे मालमत्तेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये मालमत्तेची सर्व माहिती तसेच सर्व भूमापन क्रमांक, गावाचे नाव. जमिनीचे क्षेत्रफळ, भूतकाळ तसेच वर्तमान काळात असलेल्या मालमत्तेचा मालक. या विषयाची सर्व माहिती तुम्हाला सातबाराच्या माध्यमातून कळते. प्रत्येक गावाचा किंवा शहराचा तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या संदर्भाची वेगवेगळे नोंदणीची वह्या ठेवत असतो
परंतु ह्या वाह्यांना वेगवेगळे अनुक्रमांक देण्यात आलेले असतात. यालाच गाव नमुना असे देखील म्हणतात. आणि तुम्ही तो गाव नमुना म्हणजेच सातबारा उतारा हा आता ऑनलाइन देखील डाऊनलोड करू शकणार आहेत. तुम्हाला तलाठी कडे जाऊन सातबारा आणण्याची गरज लागणार नाही. सर्व काही प्रोसेस आता तुम्हाला ऑनलाईन होताना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन होताना पाहायला मिळत असेल. तसेच सातबारा देखील आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल वरती फक्त गट नंबर टाकून डाऊनलोड करू शकता. याची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.
सातबारा उतारा मुख्य उद्देश
मित्रांनो सातबारा उताऱ्याचा मुख्य उद्देशाचा आहे. की सातबारा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सरकारने बनवलेल्या मालमत्तेच्या संदर्भातील उतारा नमूद करण्यासाठी एक रजिस्टर नोंदणी आहे. असे देखील तुम्ही समजू शकता. यामध्ये असे समजते की या जमिनीचा मालक कोण आहे. जमिनीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे. मालमत्तेचा मालक कोण आहे. तसेच जमिनीची संपूर्ण भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील माहिती आपल्याला समजते.
जसे की सिंचित किंवा पावसाने संचित झालेली जमीन आहे. यावरती आलेल्या शेतीबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला सातबाराच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातबारा उतारा मध्ये सरकारी एजन्सी कडून घेण्यात आलेल्या कर्जबाबत देखील माहिती तुम्हाला नमूद केलेली दिसते. परंतु मित्रांनो सातबारा याचा मुख्य उद्देश हा आहे. की आपल्या नावावरती किती जमीन आहे. हे आपण सातबाराच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. बऱ्याच खेडेगावांमध्ये जमिनीवरून वादविवाद होत असतात. हा सातबारा आपल्याला सांगू शकतो की कोणती जमीन कोणाच्या नावावरती किती आहे
सातबारा उतारा महत्त्व
सातबारा उताराचे खूप सारे महत्त्व आहे. सातबारा उतारा जमिनीचा मालकाचा इतिहास जाणून घेण्यात तसेच वर्तमान काळ जाणून घेण्यास आपल्याला मदत करू शकतो. त्यामुळे मालमत्तेच्या बाबतीत काही कोर्ट केस चालू आहे. का किंवा मालमत्ता कोणत्या विभागात अडकले आहे. हे देखील आपल्याला सातबाराच्या मदतीने समजू शकते. जमीन कोणाच्या नावावर आहे.किती आहे हे देखील समजेल.
वर्तमान काळाचा जमिनीचा मालक कोण आहे. जुना मालक कोण होता. याची सविस्तर माहिती तुम्हाला जमिनी निगडीत या सातबारा माध्यमातून समजते. यामुळे सातबाराचे महत्त्व खूप आहे. तुमच्याकडे देखील सातबारा तुमच्या जमिनीचा असणे गरजेचे आहे. तुम्ही जर तलाठ्याकडे गेला तर तलाठी तुम्हाला खूप वेळ लावतो सातबारा देण्यासाठी. परंतु तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील सातबारा पाहू करू शकणार आहेत. याची जी प्रोसेस आहे ती आपण तुम्हाला पुढे सांगणार आहोत.
सातबारा उतारा तुमच्याकडे असणे का आहे गरजेचे..?
मित्रांनो तुमच्याकडे सातबारा उतारा असायलाच पाहिजे. कारण सातबारा हा महाराष्ट्र मधील अत्यंत महत्त्वाचा भूमी अभिलेख दस्तऐवज आहे. ज्याची तुम्हाला कुठेही आणि कधीही गरज पडू शकते. शेत जमिनीच्या मोजमाप विषय तसेच मालकाविषयी सर्व माहिती तुम्हाला तो सातबारा प्रदान करत असतो. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या सर्वे नंबर तसेच मालकाचे नाव जमिनीचा प्रकार तुमची शेती बिगर शेती व लागवडीबद्दलचे तपशील देखील यामध्ये दिलेला असतो.
हा सातबारा उतारा तुम्ही विविध कामांसाठी वापर करू शकता. जसे की काही सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल. तर त्यासाठी तुमच्या जमिनीचा सातबारा किंवा गट नंबर देणे तुम्हाला अनिवार्य असते. जसे की सोलर पंप, कांदा चाळ इत्यादी साठी तुम्हाला सातबारा उतारा आवश्यक असतो. त्यामुळे तुमच्याकडे सातबारा उतारा असणे हे खूपच फायदेशीर आहे. मालमत्तेचा व्यवहार ठरवण्यासाठी देखील तुम्हाला सातबारा लागतो.
ज्यावेळेस आपण जमीन खरेदी किंवा विक्री करतो. त्यावेळेस मालमत्तेच्या कायदेशीर हस्तांतर करण्यासाठी सातबारा उतारा महत्त्वाचा भाग असतो. याच्याशिवाय तुम्हाला जमिनीची खरेदी किंवा विक्री करता येत नाही. तसेच कर्जाचा अर्ज करण्यासाठी देखील तुम्हाला सातबारा उतारा असणे महत्त्वाचे आहे. सातबारा उताराद्वारे तुम्ही पुरावा म्हणून हा सातबारा उतारा देऊ शकता. जमिनीवरून वादविवाद समोर आले तर तुम्ही सातबारा दाखवून देखील तो वाद विवाद मिटवू शकता. तसेच मालकी हक्काचा दावा करण्यासाठी देखील सातबारा उतारा हा फायदेशीर ठरतो.
सातबारा मधून फसवणूक करून नाव काढले तर काय करावे.
मित्रांनो आज काल फसवणुकीचे खूप काही प्रकार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुमचे जर सातबारा मधून नाव कोणी फसवणुकीने काढला तर तुम्हाला योग्य तो बदल योग्य त्या अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करावी लागणार आहे. कारण योग्य ती कागदपत्र जमा केल्याशिवाय सातबारा मधून तुम्हाला नाव हे काढता येणार नाही. तसेच सुचवल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीची सातबारे मधून नाव जर काढण्यात आले, तर सातबारेच्या उतारा मध्ये उत्परिवर्तन नोंद अस्तित्वात असते. म्हणजे जसे की या जमिनीचा मालकी हक्क कोणाचा आहे.
ही जमीन पहिली कोणाची होती. याचा मालक कोण होता, याच्याद्वारे तुम्हाला तुमची जमीन परत देखील मिळू शकते. परिवर्तन नोंद ही मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्याच्यावरून नाव काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या कागदपत्रांची माहिती देखील लागते. तरीही तुमचे नाव परत त्यात सामील होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट न घाबरतात तहसीलदार कार्यालयात प्रमाण पत्रासाठी अर्ज करू शकता. त्या प्रतीचा आधारावर तुम्हाला कायदेशीर मदत देखील होऊ शकते. जेणेकरून तुमची जर कोणी फसवणूक केली आणि सातबारा जर स्वतःच्या नावावर करून घेतला. तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता.
ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा मोबाईल वर कसा डाऊनलोड करायचा..? (Satbara Utara View On Mobile)
मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या मोबाईल मध्ये सातबारा उतारा डाऊनलोड करायचा असेल तर तुम्हाला खालील स्टेप फॉलो करून आपल्या मोबाईल मध्ये सातबारा उतारा डाऊनलोड करावा लागणार आहे.
- सर्वात अगोदर तुम्हाला महा अभिलेख https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला विजिट करायचे आहे.
- सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे डिव्हिजन निवडायचे आहे.
- नंतर आपली जमीन कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे
- तसेच आपला तालुका व गाव निवडायचे आहे.
- शेवटी आपल्याला आपला गट नंबर विचारेल आपल्याकडे जर गट नंबर नसेल तर सर्वे नंबर आपण टाकू शकतो.
- गट नंबर व सर्वे नंबर दोन्ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जमिनीच्या मालकाचे नाव देखील त्या ठिकाणी टाकू शकता.
दुसरी स्टेप (Step 2)
मित्रांनो वरील प्रोसेस करून जर तुमचा सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड होत नसेल, तर तुम्ही भूलेख ॲपवरून देखील आपला सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करू शकता याची लिंक तुम्हाला मिळेल. किंवा Play Store वर जाऊन तुम्ही Satbara Utara Maharashtra हे ॲप डाऊनलोड करून प्रोसेस करू शकता.
सातबारा उतारा अँप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.mobile.mahabhumi
मित्रांनो वरील सर्व प्रोसेस तुम्ही करून आपला मोबाईल मध्ये तुम्ही सातबारा उतारा पाहू किंवा डाऊनलोड देखील करू शकता.