PM Kisan 19th Installment: नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो आपल्याला तर माहितीच असेल की पी एम किसान योजनेचे १८ हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा झाले आहेत. व 19 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी वाट पाहत आहेत. (PM Kisan 19th Installment) 19वा हप्ता कधी येईल तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान योजनेच्या वेबसाईट वरती याची माहिती देण्यात आली आहे. की 19 वा कधी येणार आहे. त्या अगोदर आपण माहिती पाहूया की कोणत्या शेतकऱ्यांना हा 19 वा हप्ता मिळणार आहे..? (PM Kisan 19th Installment)
शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर आतापर्यंत पीएम किसान योजना अंतर्गत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. परंतु सरकार खूप महिन्यांपासून विनंती करत आहे, की ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजना अंतर्गत योजनेची ई केवायसी पूर्ण केली नसेल त्यांनी आपली केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून पुढील हप्त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेची ई-केवायसी पूर्ण केली आहे. त्याच शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही. (PM Kisan 19th Installment)
कधी येईल 19वा हप्ता..?
मित्रांनो पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2:00 pm वाजता जमा केला जाणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण आहे, त्या शेतकऱ्यांना हा 19 वा हप्ता मिळणार आहे. तुमची जर ई केवायसी पूर्ण नसेल तर तुम्ही आपल्या जवळील सीएससी केंद्रावर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता, व पी एम किसान योजनेच्या पुढील हत्यांचा लाभ घेऊ शकता. (PM Kisan 19th Installment)