Ladaki Bahin Yojana: 70 लाख महिला लाडकी बहिण योजनेतून अपात्र

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! e-KYC साठी महिलांची गर्दी; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची अपडेट

राज्यातील अनेक पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र दुसरीकडे सुमारे ७० लाख महिलांचे हप्ते थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. e-KYC पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. Ladaki Bahin Yojana

यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये महिला e-KYC करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. जालन्यातही शेकडो महिलांनी कार्यालयात गर्दी केली. मात्र कार्यालयाबाहेर “e-KYC सुरू नाही” असा फलक लावण्यात आल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला. Ladaki Bahin Yojana

याबाबत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, शासनाकडून नवीन लिंक किंवा आदेश मिळाल्यानंतरच e-KYC प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्या कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे महिलांनी घाई न करता शासनाच्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान काही महिलांनी डिसेंबर महिन्यापासून योजनेचा हप्ता मिळाला नसल्याची तक्रार केली आहे. अनेक पात्र महिलांनाही पैसे न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.Ladaki Bahin Yojana

यावर उपमुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू राहील आणि राज्यातील एकही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.”

Leave a Comment