Aadhar Card Link Or Update: ऑनलाईन पद्धतीने करा आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक किंवा अपडेट

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Aadhar Card Link Or Update: नमस्कार मित्रांनो आधार कार्ड खूप ठिकाणी वापरले जाणारे डॉक्युमेंट आहे. आधार कार्डचा वापर खूप साऱ्या ठिकाणी होतो. जसे की बँक अकाउंट उघडण्यासाठी, कोणताही सरकारी किंवा खाजगी अर्ज भरण्यासाठी तुम्हाला जर लोन हवे असेल तरीदेखील तुम्हाला आधार कार्ड असणे आवश्यक असते. अशा विविध ठिकाणी आधार कार्डचा वापर होतो.

मित्रांनो हेच आधार कार्ड तुम्हाला आता मोबाईल क्रमांकाशी लिंक करावे लागणार आहे. ते देखील तुम्ही घरबसल्या मोबाईल क्रमांकाशी आधार कार्ड लिंक करू शकणार आहेत. विविध सरकारी सेवा किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागते. आणि केवायसी साठी आधार कार्ड आवश्यक आहे. आणि आधार कार्ड जर असेल आणि आपल्याला घरी बसल्या केवायसी करायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे खूपच गरजेचे आहे. आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक कशाप्रकारे करू शकता याच्याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

 

आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक

काही लोकांचा मोबाईल क्रमांक जो आधार लिंक असतो तो हरवलेला असतो. किंवा सिम कार्ड बंद झालेले असते. अशा परिस्थितीमध्ये आधार कार्ड ला कोणताही नंबर लिंक केलेला नसतो आधार कार्ड सोबत तुम्ही मोबाईल नंबर कसा लिंक करू शकता हे आपण पाहणार आहोत. परंतु काही वेळेस नागरिकांना आधार सेंटरवर जावे लागते. आणि आधार सेंटर वरती गर्दी असल्याकारणाने किंवा त्यांचा सर्व्हर देखील काही वेळेस काम करणे बंद करतो. त्यामुळे नागरिकांना आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करता येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे.

आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणे का आहे गरजेचे

आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण तुम्हाला कोणताही सरकारी अथवा खाजगी फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे असेल किंवा बँकेतील काही काम असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी ओटीपी ची आवश्यकता असते. आणि तुम्हाला जर ओटीपी नाही आला तर अडचण होऊ शकते. यामुळे तुम्हाला आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे असते.

ऑनलाईन लिंक करू शकतो का..?

तर हो मित्रांनो आता तुम्हाला आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आपल्या तालुक्याच्या सीएससी सेंटर ला जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही.(Aadhar Card Link With Mobile Number Online) कारण काही वेळेस त्या ठिकाणी गर्दी असल्याकारणाने तुम्हाला ते सर्वर डाऊन आहे किंवा असे काही कारणे देऊन माघारी लावतात. परंतु मित्रांनो आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल द्वारे आपल्या आधार कार्ड ला आपला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक करू शकता म्हणजे तुम्हाला कोणत्याही योजनांचा किंवा कोणत्या प्रकारचा फॉर्म भरायचा असेल तर ओटीपी ची अडचण येणार नाही.

आधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट

  • सर्वात अगोदर तुम्हाला आधार कार्डच्या वेबसाईट वरती जावे लागेल. https://ccc.cept.gov.in/ServiceRequest/request.aspx
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे स्वतःचे नाव टाईप करून घ्यायचे आहे.
  • नंतर तुमचा पत्ता व पिन कोड टाईप करून
  • तुमचा ईमेल व मोबाईल नंबर क्रमांक नोंदवायचा आहे.
  • नंतर तेथे आधार सर्विसेस सिलेक्ट करा.
  • तसेच आता तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या.
  • तुमच्या मोबाईल क्रमांक वरती एक ओटीपी येईल तो तुम्हाला भरायचा (Fill The Received OTP) आहे.
  • त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट (Aadhar Number Request Number) नंबर येईल तो तुम्ही टिपून ठेवा.

तुमची आधार कार्ड मोबाईल नंबर करण्याची नोंदणी आहे. ती ऑनलाईन झालेली आहे. तुमच्या घरी दोन ते तीन दिवसात पोस्टमन येतील आणि घरबसल्या तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर आपला लिंक करून देतील. तुम्हाला कोठेही जाण्याची आवश्यकता लागणार नाही. अशा प्रकारे तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड सोबत आपला मोबाईल नंबर लिंक करू शकता. आणि तुमच्या घरात जर लहान मुल असेल पाच वर्षाच्या आतील तर तुम्ही त्याचे देखील आधार कार्ड पोस्टमन आल्यावरती काढून घेऊ शकता.

ऑनलाईन आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक कसा करावा लिंक..?

सर्वात आधी तुम्हाला तुमचे कोणतेही सिम कार्ड असेल जसे की एअरटेल, जिओ, विआय या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे. त्यानंतर आधार कार्ड वरती क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबर ला अपडेट लिंक करण्याच्या पर्यावर क्लिक करून तिथे जो नंबर रजिस्टर करायचा आहे. तो तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे. नंतर सबमिट केल्यानंतर त्यावरती ओटीपी आपल्याला त्या ठिकाणी वेरिफाय (Aadhar Linking OTP Verification) करून घ्यायचा आहे.

नंतर तुमचा आधार क्रमांक न चुकता त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तसेच टेलिकॉम ऑपरेटर ओटीपी जनरेट साठी एक मेसेज केवायसी डिटेल बाबत विचारेल सर्व नियमांचे पालन (Term & Conditions) स्वीकारायचे आहे. आणि नंतर आधार कार्ड फोन नंबर वेरिफिकेशन वरती एक कन्फर्मेशन (Confirmation) मेसेज येईल अशा पद्धतीने तुम्ही टेलिकॉम ऑपरेटर ला कॉल करून देखील याबाबत सविस्तर माहिती देऊन ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने सहज आपल्या मोबाईल द्वारे आधार क्रमांक अशी मोबाईल क्रमांक लिंक करून घेऊ शकता.

तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे..?

१) मी ऑनलाईन कुठेही न जाता आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करू शकतो का?

त्तर: तुम्ही ऑनलाईन पद्धतीने (Request) विनंती टाकू शकता नंतर पोस्टमन येऊन आपला मोबाईल नंबर लिंक करून देतील

२) एका आधार कार्डाशी किती मोबाईल नंबर लिंक करू शकतो?

उत्तर : कितीही लिंक करू शकतो पण तुम्हाला काही नियम व अटींचे पालन करावे लागेल

 

३) जर माझा आधार कार्ड क्रमांक आधीच दुसऱ्या मोबाईल सोबत लिंक आहे तर काय करू शकतो..?

उत्तर: तुमच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीच्या अधिकाऱ्यांना तुम्ही कॉल द्वारे विचारू शकता ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, किंवा तुम्ही आधार कार्ड हेल्पलाईन तसेच पोस्टमन ची सहायता देखील घेऊ शकता.

Leave a Comment