PM Kisan Yojana 16th Installment: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 15 हप्ते पूर्ण झाले आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्याला मिळाली आहे. पी एम किसान योजनेचे संपूर्ण देशभरामध्ये जवळपास आठ कोटी लाभार्थी आहेत. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता मिळतो. पी एम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे. याची माहिती आज आपण तुम्हाला सांगणार आहोत.
शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजना माहिती नाही त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकले असेल. पी एम किसान योजना. पण ही पी एम किसान योजना नेमकी काय आहे. ही योजना कोणी स्थापन केली याची स्थापना कधी झाली. याचा लाभ कोणाला मिळतो. याचा काय फायदा आहे हे सर्व आपण पाहणार आहोत.
तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पी एम किसान योजना ही योजना नरेंद्र मोदी सरकारने स्थापन केली आहे. ही योजना केवळ शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतो. शेतकऱ्यांना हे पैसे शेतीचे कामे व इतर बी बियाणे खरेदी साठी केला जातो. केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्याला 2000 हजार रुपये पाठवले जातात. ज्याचं वापर करून शेतकरी आपले शेती उपयुक्त बी बियाणे खरेदी करू शकतात.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्याला 2000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. ही योजना 1 डिसेंबर 2018 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत देशात स्थापन करण्यात आली. या योजनेअंतर्गत आता पर्यंत करोडो शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. आणि आता पर्यंत या योजनेअंतर्गत मोदी सरकारने करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 हप्ते जमा केले आहेत. आणि प्रत्यके हप्त्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 हजार रुपये जमा केले आहेत.
अखेरचा हप्ता (PM Kisan Yojana 15th Installment)
शेतकरी मित्रांनो अखेरचा हप्ता म्हणजे मागील महिन्यामध्येच अखेरचा 15वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आणि या हप्त्या अंतर्गत तुम्हाला 2000 हजार रुपये तुमच्या अकाउंट मध्ये देखील जमा केले असतील. परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता आस लागली असेल की 16 वा हप्ता कधी येईल. याच्याबद्दल शेतकरी मित्रांनो पण माहिती पाहूया मित्रांनो 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15वा हप्ता मिळालेला आहे.
पी एम किसान योजनेसाठी रजिस्टर कसे करावे..? (PM Kisan Yojana Register)
शेतकऱ्यांनो तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला Pm Kisan योजनेच्या सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ वरती भेट द्यावी लागेल. आणि तुम्हाला तेथून नवीन रजिस्टर करावे लागेल. pmkisan.gov.in या वेबसाईट वर जाऊन तुम्ही PM Kisan योजनेसाठी Registration करू शकता. तुम्ही जर या योजनेचे विद्यमान शेतकरी असाल तर तुम्हाला काही माहिती Update करायची असल्यास तुम्ही त्या ठिकाणाहून करू शकता.
नवीन रजिस्टर करण्यासाठी New Farmer Registration वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यांनतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून एंटर करायचे आहे. तुमच्याकडे जो मोबाईल असेल. त्याच्या फोन नंबर तुम्हाला टाकून, तुमचे राज्य निवडायचे आहे.राज्य निवडून तुम्हाला Image मध्ये जो टेक्स्ट (CAPTCHA FILL) दिसेल त्याला क्लिक करून तो Fill करायचा आहे.
नंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला असेल त्याच्यावरती एक OTP येईल तो तेथे टाकून तुम्ही Next करायचे आहे. त्यांनतर तुम्हाला तुमच्या बद्दल जी माहिती विचारली जाईल जसे की जमिनीची माहिती पर्सनल डिटेल्स आणखी डॉक्युमेंट भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. तुमचे देखील रजिस्टर PM KISAN योजनेसाठी होईल. नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर मेसेज येईल रजिस्टर चा.
पी एम किसान योजनेचा लाभ कोण घेऊ शकते..?
मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ हा कोणीही घेऊ शकत नाही. फक्त शेतकरीच पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात. कारण ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी किंवा औषध फवारणी खतांसाठी हे दोन हजार रुपये प्रत्येक चार महिन्याच्या अंतरावर शेतकऱ्यांना दिले जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना पैशांची अडचण असल्यास शेतकरी त्या पैशातून काही ना काही आपला शेतीचा खर्च भागवू शकतात. व उत्पन्न वाढवू शकतात या कारणाने हे उद्दिष्ट लक्षात ठेवून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ही योजना आतापर्यंत देशभरामध्ये चालू ठेवली आहे. या योजनेचे आतापर्यंत जगभरामध्ये 8 कोटी पेक्षाही जास्त शेतकरी लाभ घेतात.
पी एम किसान योजनेचा 16वा हप्ता पाहिजे असेल तर हे काम करा
शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सारखे सांगत आहेत की ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे किंवा लाभ घेत आहे. अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी करणे खूपच गरजेचे आहे. कारण की मित्रांनो आजकाल फेक डॉक्युमेंट बनवून खूप सारे लोक आपले पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेतात. आणि हा पूर्ण गैर प्रकार बंद करण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत असते.
परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपले आधार कार्डची पीएम किसान ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणजेच पुढील कोणतेही नुकसान तुम्हाला होणार नाही. 16वा हप्ता तुम्हाला तसा मिळणार नाही. तुम्ही जर पीएम किसान योजनेअंतर्गत ईकेवायसी पूर्ण केले नाही. तर तुमची हप्ते देखील बंद केले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला पीएम किसान करणे खूपच गरजेचे आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने दुकानांमध्ये जाऊन देखील पीएम किसान एक ठेवायची पूर्ण करू शकता.
पी एम किसान योजनेच्या लाभार्थी संख्येत घट
मित्रांनो ज्यावेळेस सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गती ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तेव्हापासून खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी देखील पूर्ण केली आहे. परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी ई-KYC पूर्ण केले नाही. ते शेतकऱ्यांना हप्ते मिळायचे बंद झाले आहे. किंवा जे नागरिक बनावट कागदपत्रे घेऊन पी एम किसान योजनेचा लाभ घेत होते. अशा नागरिकांची देखील हप्ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे तुम्ही जर आणखी आपली पी एम किसान योजनेची ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपली केवायसी कोणत्याही सीएसटी सेंटरमध्ये (CSC Center) मध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने सरकारच्या पीएम किसान वेबसाईटवर जाऊन देखील करू शकता.
पी एम किसान योजना ई-केवायसी कशी करायची (Pm Kisan Yojana E-kyc Process)
शेतकरी मित्रांनो तुमची देखील अजून ई-केवायसी प्रोसेस पूर्ण झाली नसेल तर तुम्हाला ई-केवायसीकरणे (E-kyc Required For PM kisan yojana) अनिवार्य आहे. ई – केवायसी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने कशी करू शकतात पाहूया. सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ओपन करायची आहे. त्यानंतर पी एम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटचे नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर तुम्हाला एक पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी i-केवायसी चा ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून आपला आधार (Enter Aadhar Card number For KYC) क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे.
त्यानंतर आधार कार्ड टाकल्यावर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. किंवा तुमचा जर मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तो तुम्ही लिंक करू शकता. फार्मर कॉर्नर मधील ई केवायसी ऑप्शन वरती क्लिक करा. पण जर तुम्हाला त्या ठिकाणी बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन करायचं (Biometric Authentication) असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते करू शकणार नाही. तुम्हाला त्यासाठी हाताचा अंगठा लागणार आहे. त्यासाठी कोणत्याही जवळच्या सीएससी सेंटर (Near CSC Center’s) वरती तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी त्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगायचे आहे.
ऑनलाईन मोबाईल द्वारे ई -kyc (How To complete E-kyc Using Mobile Or desktop)
सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. नंतर आधार ई-केवायसी चे नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
- तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि त्याच्या पुढच्या रकान्यात आकडे व अक्षर जशाचे तसे टाका.
- नंतर समोरच्या सर्च या नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करा.
- तिथे आधार नंबर दिसेल नंतर मोबाईल नंबर दिसेल.
- नंतर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी. लिंक असणे गरजेचे आहे.
- मोबाईल नंबर टाकला की पुढे तुम्हाला Get ओटीपीचे पर्याय दिसेल.
- त्यावर क्लिक करून तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी पाठवला जाईल.
- आधारसाठी तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे.
- सबमिट फॉर ऑथेंटीकेशन या रकान्यात क्लिक करू शकता.
- त्यानंतर तुमची ई केवायसी पूर्णपणे सबमिट होईल.
नंतर तुमची अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात परंतु तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही डायरेक्ट जास्त वेळ न घालवता आपल्या जवळील एसटी सेंटर वरती जाऊन पूर्ण प्रोसेस करून घ्यावी.
16वा पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येणार (PM Kisan Yojana 16th Installment Date)
शेतकरी मित्रांनो मागील महिन्यामध्येच 15वा हप्ता मिळालेला आहे. यादरम्यान आता शेतकऱ्यांना येणाऱ्या 16व्या हप्त्याचे देखील वेध लागलेले आहे. मित्रांनो पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता केव्हा व कधी जमा होणार याचा सवाल आता उपस्थित झालेला आहे. मित्रांनो या दरम्यान आपण माहिती घेतली तर पी एम किसान लाभार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. माहिती मिळाल्यानुसार आपल्याला अत्यंत सांगताना आनंद होतो की 2024 च्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये पुढील 16वा हप्ता हा जमा केला जाऊ शकतो. अशी माहिती मिळाली आहे.