Mango Farming Information: या आंब्याच्या जातीची करा लागवड मिळेल भसघोस उत्पादन

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Mango Farming Information: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला फक्त एकच ध्यास आहे की शेतकऱ्यांचा विकास करणे आजचा ब्लॉग हा आपण खास शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे. कारण शेतकरी मित्रांनो जे शेतकरी फळबाग उत्पादक शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी आजचा ब्लॉग बनवलेला आहे. शेतकरी मित्रांनो आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण कोणत्या अशा आंब्याच्या जाती आहेत. ज्या जास्त उत्पन्न आपल्याला देऊ शकतात. याबाबत बोलणार आहोत.

मित्रांनो भारतामध्ये जवळपास 1300च्या आसपास आंब्याच्या जातींची नोंद आहे. परंतु 25 ते 30 जाती फक्त व्यापार दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. तेवढ्याच आंब्याच्या जातींचा व्यापार केला जातो. ज्याच्यामध्ये कोकणी कृषी विद्यापीठाच्या रत्नही जात विकसित झालेले आहे. आणि मित्रांनो गुजरात राज्यातील केशर हे महाराष्ट्रातील अतिशय कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय भाग आहे. ज्यामध्ये आंबे पिकवले जातात. आज आपण पाहणार आहोत की कोणत्या जातींचे लागवड आपण करू शकतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे उत्पन्न आंब्याच्या झाडांमधून मिळू शकेल. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या ब्लॉग कडे वळूया.(Mango Farming Information)

शेतकरी मित्रांनो, आंब्याला तर फळांचा राजा म्हणले. जाते कारण की आंब्याला त्याचा गोडवा आणि उपयोग तथा यामुळे आम्हाला फळांचा राजा म्हणतात. क्षेत्रांची संख्या 30% ते 40% टक्के क्षेत्र आहे. ज्याच्यापासून 70 ते 90 टन इतके आंब्याचे उत्पन्न मिळते. आता जर काही थंडी असलेले काही भाग सोडले तर जवळपास बऱ्याच राज्यांमध्ये आंब्याची लागवड आपल्याला आढळून येते.

आंबा लागवडीचे क्षेत्र हे उत्तर प्रदेश असून आंध्रप्रदेश हे राज्य आंबा उत्पादनामध्ये नंबर वन आहे. भारतामध्ये होणाऱ्या एकूण फळांच्या आणि फळ प्रक्रिया बाबत जर विचार केला तर आंब्याचा वाटा हा 60% टक्के एवढा आहे आंब्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनविता येतात.

आंबे कधी कोणत्या सीजन मध्ये येतात..?

तसा विचार केला तर आंब्याचा सिझन हा उन्हाळ्यामध्येच असतो. जसे की एप्रिल, मार्च, मे, जुन, या महिन्यामध्ये आंबे आपल्याला पाहायला मिळतात. आधुनिक शेतीच्या माध्यमातून ही झाडे निर्माण केले जातात. या कारणामुळे कोणत्याही सीजनमध्ये आपल्याला आंबे उपलब्ध होऊ शकतात. आज आपण बऱ्याचशा आंब्याच्या जातींबद्दल बोलणार आहोत. ज्यामधून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते.

आंब्या पासून कोणकोणते पदार्थ बनतात.

मित्रांनो आंब्यापासून जर आपण विचार केला तर कोण कोणते पदार्थ बनतात तर मित्रांनो आंबा कापून देखील खाऊ शकतो तसेच आमरस, कच्च्या आंब्याची चटणी, कच्च्या कैरीचे पन्हे, आंब्याची पोळी, आंब्याच्या आमचूर, आंब्याचा शॉक्स, टॉफी अशा प्रकारचे आंब्यापासून बनवले जाणारे पदार्थ आहेत. ज्यामध्ये मुख्य आहे आमरस, आंब्याचा ज्यूस, व आंब्याचे लोणचे, ये पदार्थ बनविण्यासाठी देखील आंब्याचा उपयोग होतो.

आंबा खाण्याचे फायदे:-

आंबा खाण्याचे खूप सारे फायदे देखील आहेत जसे की तुम्ही जर दुपारच्या जेवणानंतर आंबा खाल्ला तर यामधील पोषक तत्त्वांमुळे आणि फायबर मुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होण्यास मदत होते. तसेच याने तुम्हाला वजन कमी करण्यात देखील मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही दुपारी जेवणानंतर आंब्याचा रस किंवा आंबा खाऊ शकता. आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याकारणाने आंब्यातील फायबर रक्त घटकातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि वजन राखण्यास देखील मदत करते यामुळे नियमितपणे तुम्ही आंबा खाऊ शकता.

मित्रांनो काही लहान मुलांना आंबा हा खूप जास्त आवडतो. कारण आंबा हा गोड पदार्थ आहे.(Sweet Mango) याच्यापासून बरेचशे पदार्थ तयार केले जातात. उन्हाळा आणि आंबा यांची अगदी घट्ट नाते मानले जाते. कारण आंबा हा सर्वाधिक उन्हाळ्यामध्ये खाल्ला जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. त्यामुळेच त्याला फळांचा राजा देखील म्हणतात. काही लोक उन्हाळा म्हणजेच आंब्याचा सीजन असे देखील म्हणतात. आंबा आणि आमरस याशिवाय उन्हाळ्याची काहीच मजा नसते. दररोज उन्हाळ्यामध्ये एक तरी आंबा आपण जेवणात खातच असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का..? आंबा खाण्याचे खूप सारे फायदे देखील आहेत.

आता आपण माहिती पाहूयात की कोणत्या आंब्याच्या जाती अशा आहेत. त्यातून स्वाद आणि मधुरच वसलेला कोणते उत्कृष्ट जात आहेत. जो आंबा पिकल्यानंतर आकर्षक तांबू पिवळसर रंग होतो अशा जातींबद्दल आपण बोलूयात.

केशर आंबा:

कारण हापूस आंब्याच्या तीन ते चार पटीने जास्त उत्पन्न देणारी ही एक आंब्याची अशी जात आहे. ज्यामधून तुम्हाला उत्पन्न देखील भरपूर मिळू शकते. या जातीचे लागवडी खालील क्षेत्र देशभर वाढू देखील लागलेले आहे. या जातीच्या आंब्यांना चव गोडवा असतो. या कारणामुळे लोक हा केशर आंबा खरेदी करण्यासाठी सज्ज असतात. आणि तुम्ही एक वेळेस याची फळ तोडणी केली आणि आंबा जर पिकला तर आंबा पिकल्यानंतर देखील पाच ते सहा दिवस आंबा आरामात टिकू शकतो.

पायरी आंबा:

पुढे येतो शेतकरी मित्रांनो पायरी आंबा. हापूस आंब्यापेक्षा देखील जास्त उत्पन्न देणारी जात आहे. यामध्ये मध्यम आकाराची फळे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लाल रंगाची ही फळे असतात. म्हणजेच खूप जास्त या आंब्यांना रस असतो. आणि ही फळे गोड असतात. मात्र पिकल्या नंतर ती फळे जास्त काळ टिकत नाही. लवकर आपल्याला त्याची विक्री करावी लागते. कारण हे आंबे जास्त दिवस राहिले तर ते खराब होण्याची शक्यता असते.

तोतापुरी आंबा:

कर्नाटक राज्यामधील तोतापुरी आंबा ही एक मुख्य जात आहे. या जातीला “बंगलोरा” नावाने देखील कर्नाटकामध्ये ओळखले जाते. हे आंबे दोन्ही टोकास निमुळते आणि बाकदार असतात. हिरवा रंग असतो. आणि पिवळसर त्यावर चमकदार तांबूस चट्टे देखील आपल्याला पाहायला मिळतात. हा आंबा खाण्यासाठी देखील उत्कृष्ट असतो.

लंगडा आंबा:

हा आंबा “उत्तर प्रदेशात” मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. तसेच या आंब्याची जात कोणत्याही ठिकाणी आपण लावू शकतो व उत्पन्न घेऊ शकतो. हा आंबा हिरवट असतो. आणि आकारानी हा आंबा लांब व गोल असतो. आतील भागात या आंब्यामध्ये कर हे गोड असून या आंब्याची काय खूपच लहान असते. पण या आंब्याची साल पातळ असते. हा आंबा पिकल्यानंतर जास्त काळ करू शकत नाही.

आम्रपाली आंबा;

शेतकरी मित्रांनो आम्रपाल आंबा हा भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांनी दशेरी मध्ये आणि नीलम नर यांच्या जात आहे. या आंब्याची चव उत्तम चविष्ट आहे. पण ही फळे जरा उशिरा येतात. बाकीचे आंबे ज्या वेळा पिकतात त्यावेळेस ही फळे येतात. हे झाडे खूपच लहान असतात. कारण यांना कलम केलेला असतो. यामुळे एकेरी आंब्याच्या झाडांची संख्या अधिक असते. या झाडांना पाण्याची गरज इतर जातीच्या आंब्या पेक्षा अधिक प्रमाणात लागत असते. म्हणजे या आंब्यांना जास्त पाणी तुम्हाला द्यावे लागते.

Leave a Comment