Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये पुढील 10 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

परिषद निवडणुकीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यात येणार ₹४,००० Namo Shetkari Yojana

राज्यातील शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी महिना दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता एकाच कालावधीत जमा होण्याची चर्चा आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹४,००० जमा होऊ शकतात.

नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत देते. योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारीत देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. त्याच वेळी पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता देखील याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. दोन्ही योजना मिळून शेतकऱ्यांना एकाच वेळी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीआधी हा निधी वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याने, त्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. अंदाजे पुढील ८ ते १० दिवसांत रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सुमारे ९० ते ९४ लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसांतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल, असंही सांगितलं जात आहे.Namo Shetkari Yojana

👉 सूचना: लाभ मिळण्यासाठी आधार-सीडिंग, बँक खाते व केवायसी अपडेट असणं आवश्यक आहे.

Leave a Comment