land ownership: या 7 कागदपत्रांच्या द्वारे जमीनीवर स्वतःच्या मालकीचा हक्क सिद्ध करता येणार,
land ownership: जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण अशी एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये पाहणार आहोत की तुमच्याकडे जर हे सात कागदपत्रे असतील तर जमीन तुमच्या मालकीची आहे तर शेतकरी मित्रांनो ती कोणती कागदपत्रे आहेत हे पाहणार आहे त्या आधी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा तर चला तर मित्रांनो आपण आजच्या अपडेटला सुरुवात करूया..
शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आज आपण पाहणार आहोत की तुमच्या शेती विषयी महत्त्वाची माहिती जे आपण माहिती पाहणार आहोत ती माहिती सर्व शेतकऱ्यांना खूप उपयोगी पडणार आहे त्यामुळे पूर्ण माहिती वाचा. या माहितीमुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमची जमीन तुमच्या नावावर आहे हे सिद्ध करण्यासाठी काही अडचण येणार नाही.
सध्याच्या काळामध्ये आजकाल जमिनी वाचून खूप भांडण चालू असतात हे भांडण काही वेळेस खूप वाढत जाते यामुळे काही वेळेस हाणामारी होते व शेतकऱ्यांचे कोर्टापर्यंत केस भानगडी होतात यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानी होते आणि पैसेही जातात हे वाचवण्यासाठी तुम्हाला जे सात पुरावे आहेत ते सांगणार आहे.
जमीन ही तुम्ही करत असतात म्हणजे च ही जमीन तुमचीच आहे असे म्हणून तुम्ही अनेक वर्षापासून ती जमीन तुमची म्हणत आहात. मात्र एखाद्या जमिनी संदर्भात काही वाद निर्माण झाला तर ही जमीन आपली आहे आणि या जमिनीचा मालक मी वर्षानुवर्ष आहे असे आपण म्हणत असतो. मात्र कायद्याच्या दृष्टीने ते खरंच असेल असं नाही . यामुळे कायद्याप्रमाणे तुमच्याकडे जमीन आपलीच आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही ठोस कागदपत्रे लागतात.
शेतकरी मित्रांना अनेक वेळा असे होते की एखादा शेतकरी अनेक वर्षापासून एखाद्या जमिनीची खूप मेहनत करत असतो. मात्र दुसऱ्यांची शेतकरी काही वर्षानंतर म्हणतो की ही जमीन माझ्या मालकीची आहे. तर यावेळेस शेतकरी मित्रांचे खूप भांडण लागते अशा या घटनेमुळे आपल्या जमिनीच्या स्वतंत्र मालकीचे भांडण होऊ नये यासाठी सरकारने कायद्यानुसार जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी शेतकरी मित्रांना हे 7 पुरावे सोबत ठेवावे लागतील.
land ownership: हे सात कागदपत्रे असतील तर जमीन तुमच्या नावावर आहे
1) खरेदी खत
खरेदी खतावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला आहे त्याचबरोबर जमिनीचे क्षेत्र किती आहे. जमीन कोणाकडून घेतली आहे. आणि किती किमतीला घेतली आहे. अशी संपूर्ण माहिती या खरेदी खतावर असते.
2)8-अ उतार
हे कागदपत्रे देखील शेतकरी मित्रांना जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
3) जमीन महसूल पावती
शेतकरी दरवर्षी आपल्या शेत जमिनीचा महसूल भरत असतो. हा महसूल भरल्यानंतर शेतकरी तलाठ्याकडून पावती पुरावा घेऊन येतात तोच पुरावा म्हणजे जमीन महसूल पावती शेतकऱ्यांना आपल्या मालकीची जमीन आहे हे सिद्ध करण्यासाठी हा एक पुरावा आहे.
4) जमीन मोजणी केलेला नकाशा
हा नकाशा देखील शेतकऱ्यांसाठी जमिनीवर स्वतःचा मालकीचा हक्क असल्याचा मोठा पुरावा आहे. कारण यामध्ये देखील अनेक अनेक प्रकारची मालकी हक्क असल्याची माहिती मिळते.
5) सातबारा उतारा.
सातबारा उतारा मध्ये संबंधित जमिनीचा उल्लेख केला जातो. त्यामधील कोणकोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. व त्या कागदपत्र वर कोणते शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे सविस्तरपणे माहिती देण्यात येते म्हणून शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा हा एक पुरावा आहे.
6) प्रॉपर्टी कार्ड
शेतकरी मित्रांचे जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड हे असणे शेतकरी मित्रांसाठी आवश्यक आहे.
7) संबंधित जमिनीचे खटले
शेतकरी मित्रांनो तुमच्या मालकीची जमीन असेल आणि या या जमिनी बाबत पूर्वी कोणती केस किंवा कोर्टामध्ये चाललेला खटला असेल तर अशा केसची कागदपत्रे त्यातील जबाबाच्या प्रति निकाल पत्र इत्यादी कागदपत्रे जपून ठेवणे आवश्यक आहे.