Ladaki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी दिलासा! जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता होती. ई-केवायसी पडताळणीमुळे अनेक लाभार्थींना पैसे मिळण्यात अडथळे येत होते. अखेर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने पात्र महिलांसाठी दिलासा दिला आहे. अनेकांच्या खात्यात 1500 रुपयांचा जानेवारी हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

ऑक्टोबर 2025 पासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि फॉर्म भरताना झालेल्या चुका यामुळे सुमारे 86 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. या अडचणी लक्षात घेऊन सरकारने ई-केवायसीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे.

यापूर्वी राज्यात सुमारे 2.4 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. पण पडताळणीनंतर डिसेंबर 2025 मध्ये केवळ 1.6 कोटी महिलांनाच शेवटचा हप्ता मिळाला होता. जानेवारी महिन्यात निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाल्याने त्या महिन्याचा हप्ता थांबला होता.

आता जानेवारीचा हप्ता जमा होऊ लागला असला तरी फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपले ई-केवायसी आणि अर्जातील माहिती योग्य आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

महत्त्वाची सूचना: Ladaki Bahin Yojana
ई-केवायसी करताना ‘कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का?’ या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यामुळे अनेक पात्र महिला अपात्र ठरल्या होत्या. त्यामुळे माहिती भरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment