Crop Insurance: शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 2 दिवसात पिक विमा रक्कम

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचे बातमी समोर आली आहे. मित्रांनो जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2023-2024 245.41 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर झालेला आहे. आतापर्यंत 12 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. उर्वरित 112 कोटी रुपये नुकसान भरपाई लवकरच पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. अशी माहिती पीक विमा कंपनीने कळविली आहे. कृषी विभागातील माहिती जारी करण्यात आली आहे.

 

 

बुलढाणा जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजना राबवली जात आहे. 2023 या हंगामासाठी 1 लाख 35001 शेतकऱ्यांना २५५ कोटी ४१ रुपये लाख रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी 9282 शेतकऱ्यांना 12 कोटी 93 लाख रुपये नुकसान भरपाई जारी झालेली आहे. व आता सध्या 7912 कोटी रुपये नुकसान भरपाई मागील आठवड्यात मंजूर झालेले आहे. व ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

कधी होणार ही रक्कम जमा (Crop Insurance)

पुढील एक ते दोन दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे रकमेच्या 110% प्रीमियम नुकसान भरपाई वितरण केले असून उर्वरित नुकसान भरपाई ची रक्कम पिक विमा कंपनीने राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे. गेल्या 2023 वर्षांमध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा कंपनीने पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत 295 हजार शेतकऱ्यांना 252 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केले होते. त्यापैकी दोन लाख 24 हजार शेतकऱ्यांना 138 कोटी 51 लाख रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात आले होते.

प्रीमियम रकमेच्या 110% भरपाई आता वितरित केली जाणार आहे. व ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. कंपनीने अशी माहिती कळवली आहे. की अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांमधील कृषी उपसंचालकांनी देखील ही माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्याचा लवकरच ही रक्कम जमा होणार आहे.(Crop Insurance)

Leave a Comment