Cotton rates Will Increase: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की शेतकऱ्यांच्या पिकाला कधी जास्त भाव मिळत असतो. तर कधी कमी परंतु शेतकरी मित्रांनो मागील वर्षी पेक्षा या वर्षी कापसाला खूप कमी दर मिळत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो भारतातील शेतकऱ्यांसाठी कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. याच पिकाला पांढरे सोने असे शेतकऱ्यांनी टोपण नाव दिलेले आहे.
कारण शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणजे कापूसच आहे. मात्र यंदा मान्सून उशिरा झाल्यामुळे ऑगस्टमध्ये जास्त पाऊस झाल्याकारणाने अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही विकला गेलेला नाहीये परंतु प्रतिकूल हवामानमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत कापूस उत्पादनामध्ये 30 ते 35% कमतरता जाणवले आहे.ज्यावेळेस कापसाला जास्त भाव मिळेल. त्यावेळेस शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी नेतात.
कापसाचे सध्याचे बाजारभाव
परंतु शेतकरी मित्रांनो कापसाला सध्या 6500 हजार ते 7000 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. राज्यात खाजगी बाजारपेठेमधून आतापर्यंत 5.5 लाखाच्या गाठीची खरेदी करण्यात आलेले आहे. परंतु शेतकरी मित्रांनो आतापर्यंत कापूस हा दिवाळीच्या आसपास बाजारात येतो. जानेवारीमध्ये कापसाला जास्त भाव मिळेल किंवा कमी होईल हे कारण शेतकऱ्यांना सतावू लागले आहे. कारण कापसाला जर चांगला भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा जो खर्च आहे. त्याच्यातून निश्चित फायदा खूपच कमी उत्पन्न निघेल कारण मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे. की आपण तर शेतकरीच असाल.
कापसाचा वापर कोठे होतो..?
मित्रांनो शेतकरी तर कापूस लावतात त्याला पिकवतात आणि वनस्पती पासून मिळणारा कापूस हा मार्केटमध्ये विकला जातो. परंतु हा कापूस याचा उपयोग कोठे केला जातो. हे तुम्हाला मला माहित आहे का..? तर पाहूया मित्रांनो कापसाचा वापर कुठे केला जातो. तर मित्रांनो कापसाचे बियांना सरकी देखील म्हटले जाते. सरकी हे गुरांचे खाद्य आहे. सरकी पासून मित्रांनो तेल देखील बनवले जाते सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे स्वस्त तेल आहे.
तेलाच्या तसेच अन्य व्यवसायांमध्ये देखील कापसाचा वापर होतो मित्रांनो कापसामध्ये जवळपास 95 टक्के सेल्युलोज असते. कापसाच्या एका नवीन जातीचा शोध देखील लावण्यात आलेला आहे याचे नाव आहे सावरी. मित्रांनो मराठी व हिंदी मध्ये कापसाला रुई देखील काही ठिकाणी म्हणतात. मात्र रुई या विषारी वनस्पतीचा आणि कापसाचा कोणत्याही प्रकारचा संबंध आढळत नाही. मित्रांनो रुई झाडे विषारी असते. परंतु रुईच्या झाडापासून एक प्रकारचा अतिशय मऊ कापूस आपल्याला मिळतो त्याच्या गाद्या, उषा किंवा बेडशीट बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
कोणत्या देशात सर्वाधिक कापूस आढळतो
रुईच्या झाडापासून निसटलेला हा मऊ कापूस उधरत असतो. मित्रांनो कापसाचे उत्पादने अमेरिका, अर्ज टीना ऑस्ट्रेलिया, चीन किंवा ब्राझील भारत या देशांमध्ये कापूस जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. मित्रांनो जगातील कपाशी खालील क्षेत्र एक चतुर्थार्थ क्षेत्र भारत हा लागवडीखालील सर्वात जास्त लागवडीखालील देश आहे. महाराष्ट्रा राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक शेतकरी घेतात. कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात हे भरतात केले जाते.
कापसाला शेतकऱ्यांनी केलेला खर्च
की कापसाला भरपूर साऱ्या फवारण्या देखील करावा लागतात. काही वेळेस कापसावरती कीड देखील पडते याचे नियंत्रण राखण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या फवारण्या किंवा गावात झाल्यावर तन नाशक मारावी लागते. ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील खूप होतो या कारणाने शेतकरी खूपच दुःखात आहेत. की कापसाचे भाव वाढतील की नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे दर नेहमी पहावे लागतात. शेतकरी मित्रांनो चीन नंतर भारत हा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे.
शेतकऱ्यांना तर माहितीच असेल की कापूस पिकावर खूप सारे रोग पडतात. जसे की मुळकुज, दह्या, कवडी, पानावरील काळे ठिपके, बोंडावरील काळे ठिपके, करणा, तसेच तिन्ही रोग या सर्व रोगांवरील औषधे देखील बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्याचे रेट/किंमत Rates खूपच जास्त प्रमाणात असल्याकारणाने शेतकऱ्यांनी ते खरेदी करून जसा रोग पडला आहे. तसे औषध फवारणी केले आहे. या कारणाने शेतकऱ्यांचा खर्च हा खूपच जास्त प्रमाणात झालेला आहे.
शेतकऱ्यांचा खर्च हा शेतकऱ्यांना जी मिळणारी रक्कम आहे. त्याच्यापेक्षा जास्त असल्या कारणाने शेतकरी आपला कापूस बाजारात नेण्यासाठी टाळाटाळ करतात. या कारणाने शेतकऱ्यांना अशी आशा आहे. की सर्वांचे कापूस विक्रीला जातील व आपला कापूस शेवटला राहील. म्हणजेच कापसाची कमतरता भासल्यास कापसाचा दर हा वाढेल हा शेतकऱ्यांचा आत्ताचा मनातील प्रश्न आहे.
परंतु शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस कापसाची जास्त प्रमाणात कमतरता भासते. त्यावेळेस कापसाचे दर हे अचानकपणे वाढू शकतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मित्रांनो काही वेळेस आयात व निर्यात बंद असल्याकारणाने कापसाचे दर कधी वाढतात तसेच कमी देखील होतात. कोणत्याही शेतकऱ्यांच्या पिक मालाचे दर हे अचानकपणे वाढतात. जसे की टोमॅटो, कांदा, कापूस, सोयाबीन यांचे दर देखील मित्रांनो काही वेळेस खूपच कमी असतात. परंतु अचानकपणे आपण अंदाज पण लावलेला नसतो एवढे शेतमालाचे त्याचे दर आपल्याला पाहायला मिळतात.
जगातील सुमारे 25 टक्के कापूस उत्पादन भारत देश करतो 2022 आणि 23 साठी गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाच्या आयातीमध्ये 55 टक्के आणि निर्यातीमध्ये 30 टक्के वाढ अपेक्षित होते परंतु जागतिक स्तरावर 2023-24 मध्ये कापसाचे उत्पादन 115 दशलक्ष वाढण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. अमेरिका या देशात कापसाचे उत्पन्न जास्त असले तरी देखील चीन तुर्की मध्ये हे उत्पन्न कमी प्रमाणात आपल्याला पाहायला या वर्षी मिळाले आहे.
कापसाचे दर वाढतील का..?
शेतकरी मित्रांनो गेल्या काही चार ते पाच दिवसांमध्ये अकोला बाजारपेठेमध्ये कापसाच्या दरात थोडीशी घसरण देखील आपल्याला जाणवले आहे. पुणे कृषी विभागाच्या बाजार माहिती आणि जोखीम व्यवस्थापन कक्षा नुसार 2024 च्या पहिल्या ते तिसऱ्या महिन्यापर्यंत म्हणजे जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत दर 7000 ते 8000 हजार रुपये प्रतिक्विंटल असे राहतील. असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
कधी वाढू शकतात कापसाचे दर..?
या कारणामुळे येणाऱ्या काही दोन ते तीन महिन्यांमध्ये कापसाचे दर दर हे स्थिर राहण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. उशिरा मान्सून पाऊस झाल्यामुळे उत्पन्नावर देखील भरपूर प्रमाणात घट झालेली आपल्याला पाहायला मिळते.
आजचे ताजे कापूस बाजारभाव
- बजारसमिती संगमनेर
- आवक 100
- कमीतकमी दर 5500
- जास्तीत जास्त दर 6800
- सर्वसाधारण दर 6150
- बजारसमिती राळेगाव
- आवक 4000
- कमीतकमी दर 6500
- जास्तीत जास्त दर 7020
- सर्वसाधारण दर 6900
- बजारसमिती देऊळगाव राजा
- आवक 2990
- कमीतकमी दर 6600
- जास्तीत जास्त दर 7145
- सर्वसाधारण दर 6900
- बजारसमिती हिंगणघाट
- आवक 8000
- कमीतकमी दर 6000
- जास्तीत जास्त दर 7170
- सर्वसाधारण दर 6500
- बजारसमिती सावनेर
- आवक 3500
- कमीतकमी दर 6700
- जास्तीत जास्त दर 7000
- सर्वसाधारण दर 6750
- बजारसमिती श्रीगोंदा
- आवक 1025
- कमीतकमी दर 6800
- जास्तीत जास्त दर 7000
- सर्वसाधारण दर 6900
- बजारसमिती भद्रावती
- आवक 602
- कमीतकमी दर 6800
- जास्तीत जास्त दर 7020
- सर्वसाधारण दर 6910
शेतकरी मित्रांनो वरील बाजारभाव पाहून आपल्या समजलेच असेल की कमीत कमी दर हे 5500 हजार रुपये ते 6000 रुपये पर्यंत आहेत. तसेच जास्तीत जास्त दर हे सात हजार रुपये पर्यंत आहे. तसेच सर्वसाधारण दर 7200 एवढा आपल्याला मिळत आहेत. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की शेतकऱ्यांना जास्त दर मिळत नसल्याकारणाने शेतकरी खूपच नाराज आहेत. शेतकऱ्यांना आशा आहे की दर वाढतील. काही शेतकऱ्यांनी आपला कापूस हा विक्रीसाठी नेण्यापासून जपून ठेवलेला आहे. घरामध्ये साचून ठवला आहे ज्या वेळेस कापसाला चांगला बाजारभाव मिळेल. त्यावेळी शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी घेऊन जातील.
कापसाचे दर वाढतील की कमी होतील..?
परंतु निर्यात बाजारातील स्थिर मागणीने जानेवारी 2024 ते मार्चमध्ये शेतकऱ्यांना कापसाच्या दरामध्ये चांगली वाढ पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु शेतकऱ्यांना आमचे काम हे तुम्हाला कापसाचे ताजे व पुढील काळातील तज्ञांच्या मते सांगितले जाणारे बाजार भाव सांगणे असते. कापसाचे भाव कमी होतील किंवा वाढतील याची जबाबदारी एम एस उद्योजक (MS UDYOJAK) टीम घेत नाही याची खात्री करावी.धन्यवाद