Soilless Verticle Farming:नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत देश हा “कृषीप्रधान” देश मानला जातो. परंतु आता मातीविरहित (Verticle Farming) शेती ही काळाची गरज बनली आहे. भारतीय शेतीने आतापर्यंत एक आगळावेगळा इतिहास रचलेला आहे. परंतु आता वाढत्या शहरी करणामुळे आणि हवामानामध्ये बदल होत असल्याकारणाने माती विरहित शेती करणे ही काळाची गरज बनलेली आहे.
शेतजमीन ही कमी होत चालल्या कारणाने शेतीची व्याप्ती कमी प्रमाणात राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु हीच बाब लक्षात घेऊन माती विहिरीत शेती करण्याचे प्रोत्साहन देण्याची गरज निर्माण झाली आहे. आता तुम्ही माती विहिरीत शेती करू शकणार आहेत. याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखाद्वारे आपण तुम्हाला सांगितली आहे. कृपया हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला माती विरहित शेती बद्दल माहिती मिळू शकेल.
माती विरहित शेतीला व्हर्टिकल फार्मिंग असे इंग्लिश नाव दिलेले आहे. कारण तंत्रज्ञान प्रामुख्याने वाढत चालले आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून सूर्यप्रकाश उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी. जसे की बालकनी, छतावरती किंवा नर्सरीमध्ये पिकांची लागवड केली जाऊ शकते. यामध्ये केवळ भाजीपाला नाही तर विविध औषधी वनस्पती जसे फुले, फळे इत्यादी या पद्धतीची शेती केली जाऊ शकते. आपण जाणून घेऊया की मातीविरहित शेती कशाप्रकारे केली जाऊ शकते.
कसे होत आहे शेतिकरण्याचे क्षेत्र कमी
मित्रांनो शेतीचे क्षेत्र कसे कमी होत आहे, याबद्दल आपण बोलूयात. मित्रांनो असे समजा की एखाद्याच्या आजोबांना शंभर एकर शेती असते. परंतु त्यांना 2 मुले होतात नंतर दोन्ही मुलांना 50 एकर 50 एकर जमीन वाटणी होते. शेती पहिल्या मुलाला 50 एकर तसेच दुसऱ्या मुलांना 50 एकर नंतर दुसऱ्या मुलाला 2 मुले होतात नंतर त्यांना. 25 एकर एका मुलाला व दुसऱ्या मुलाला 25 एकर नंतर त्यांना 4 मुले होतात समजा परत त्यांची वाटणी होताना त्यांच्या वाट्याला 6.25 एकर जमीन क्षेत्र येते. अशाप्रकारे शेतीचे क्षेत्र कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे तुम्हाला वर्टिकल फार्मिंग म्हणजेच मातीविरहित शेती करणे गरजेचे आहे.
माती विहिरीत शेती करणे का आहे गरजेचे (Verticle Farming)
मित्रांनो माती विहिरीत शेती करणे हे खूपच गरजेचे आहे. कारण दिवसेंदिवस संसाधनाची कमतरता आपल्याला जाणून येत आहे. किंवा लोकांना जास्त शेत देखील राहिलेली नाही. त्यामुळे Verticle Farming शेती ही सध्याची काळाची गरज बनलेली आहे. त्या माध्यमातून पाण्याची बचत किंवा जे काही मातीचे प्रदूषण होते. ते रोखले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गुणवत्ता पूर्ण उत्पादन तसेच उत्पादनामध्ये भरघोस वाढ देखील होण्याची शक्यता आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नगदी पिकांची शेती यशस्वीरित्या केली जाऊ शकते. यामुळे पाण्याची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. आपण जास्त अशी क्षेत्रात शेती केली तर जास्त पाणी लागते. परंतु तुम्ही जर वर्टीकल फार्मिंग शेती केली तर तुम्हाला पाण्याची गरज देखील जास्त लागणार नाही.
माती विरहित शेती व त्याचे प्रकार (Verticle Farming Types)
या Verticle Farming प्रकाराबद्दल आपण बोललो तर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान तसेच युरोपोनिक तंत्रज्ञान याद्वारे आपण शेती करू शकतो. याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. या दोन्हींमध्ये नेमका कोणता फरक आहे. ज्यामध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न कसे मिळू शकते पाहुयात.
माती विरहित शेती व वर्टीकल फार्मिंग चे फायदे (Benefits Of Vertical Farming)
शेतकरी मित्रांनो व्हर्टिकल फार्मिंग चे फायदे बघायला गेले तर कमी जागेत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी व्हर्टिकल फार्मिंग चा वापर करून पारंपारिक पद्धतीने कमी जागेत पिके घेतली जातात. तसेच जागेची बचत देखील होते. पण व्हर्टिकल फार्मिंग मध्ये पारंपारिक शेती पद्धतीच्या तुलनेत कमी जागेत पिकांची लागवड केली जाते. आणि पिकांना अनेक उभ्या स्तरांमध्ये वाढवली जाते. त्यामुळे शेत्र कमी लागते आणि जागेची देखील बचत होते.
वर्षभर पिकांचे उत्पादन याच्यामध्ये पॉलिहाऊस मध्ये पिके पिकवली जातात त्यामुळे पिकांना नियंत्रित वातावरण दिले जाऊ शकते. यामुळे वर्षभर वेगवेगळी पिके आपण त्या मातीच्या स्वरूपातून घेऊ शकतो. कोणत्याच पिकाला हंगाम येण्याची किंवा अनुकूल वातावरण हवामान याची वाट पहावी लागत नाही. तुम्ही कोणत्याही वातावरण देखील तयार करू शकता. मातीशिवाय शेती केली तर मातीविना केल्या जाणाऱ्या शेती पद्धतीचा व्हर्टिकल फार्मिंग द्वारे वापर केला जातो.
हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स या तंत्रज्ञानाचा वापर करून व्हर्टिकल फार्मिंग करताना याचा वापर केला जातो. व पिकांची वाढ केली जाते. त्यामुळे पारंपारिक शेती पद्धतीपेक्षा ९० टक्के कमी पाण्याचा वापर होतो. या पद्धतीमध्ये प्रकाशासाठी बल्ब तसेच दिवांचा देखील वापर केला जातो. यामुळे नैसर्गिक प्रकाश याची आवश्यकता जास्त प्रमाणात कमी असते.
वर्टीकल फार्मिंग मध्ये पीक वाढीसाठी लागणारे घटक जसे की तापमान, प्रकाश, आद्रता किंवा पोषक द्रव्य, यांचे वितरण यासारख्या पर्यावरणाच्या घटकांना सहजरित्या उपलब्ध करून दिले जाते. यामुळे पिकाची योग्य प्रकारे वाढ आणि उत्पन्न देखील चांगले मिळते. जमीन संवर्धनाबाबत जर आपण बोललो तर व्हर्टिकल फार्मिंग मध्ये उभ्या थरांमध्ये पिकांची लागवड केली जाते. यामुळे मर्यादित जिरायती जमीन असल्यावर शेतकऱ्यांसाठी वर्टीकल फार्मिंग उपयुक्त पद्धत आहे. मातीतील रोग कमी होतो. पिकांची लागवड केली तर पूर्ण मातीमध्ये केली जात नसल्याकारणाने माती पासून पसरणारे रोग यांचा प्रादुर्भाव पिकांवर जास्त होत नाही. व्हर्टिकल फार्मिंग मुळे बुरशीनाशके आणि कीटकनाशके यांचा वापर देखील कमी प्रमाणात केला जातो व पैशांचीही बचत होते.
हायड्रोपोनिक तंत्रज्ञान द्वारे माती विरहित शेती (Verticle Farming by Using Hydroponic)
मित्रांनो हायड्रोपोनिक तंत्रज्ञान ही माती विरहित शेती करण्याचे एक मुख्य तंत्रज्ञानातून या तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य प्रमाणात पिकांना ऑक्सिजन उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून शहरी भागांमध्ये ताजी फळे व भाजीपाला यांचे उत्पन्न घेण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते. घटत्या शेतीमुळे ही काळाची गरज बनलेली आहे. जास्त शेतीला क्षेत्र उपलब्ध नसल्या कारणाने नागरिक/शेतकरी या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मातीविरहित शेती योग्यरीत्या करू शकतात. संसद दराची कमतरता आणि कृषी योग्य जमीन उपलब्ध नसल्याकारणाने या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नागरिक शेती देखील करत आहेत.
एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापरत करून त्याद्वारे मातीविरहित शेती (How Use Airoponics For Verticle Farming)
शेतकरी मित्रांनो एरोपोनिक्स तंत्रज्ञान बद्दल आपण बोललो तर हे तंत्रज्ञान पिकांच्या मुळाशी हवा पाठवते. मातीची कमतरता असल्याकारणाने वातावरणातील आद्रता शोषून घेणे घेऊन. पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात करते. मात्र या तंत्रज्ञानामध्ये काही विशिष्ट कारण आहेत ती नंतर पिकांच्या मुळाची पाणी आणि पोषक तत्त्वांची फवारणी करणे गरजेचे असते.
या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानाचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे मातीविरहित शेती करू शकतो. तसेच शेती करताना पाणी आणि खतांच पोषक तत्त्वाचा वापर हा खूप कमी प्रमाणात केला जातो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करताना पिकासाठी कोणत्याही कीटकनाशकांचा वापर करायला लागली नाही. कारण पिकांना नियमित वातावरनात वाढवले जाते. त्यामुळे त्यांच्यावरती कोणताच रोग व कीटक पडत नाहीत. ही एक चांगली गोष्ट लक्षात आली आहे. या कारणामुळे देखील बरेच लोक एरोपोनिक्स द्वारे शेती करतात. त्यामुळे आपल्याला जास्त खर्चही होत नाही.
मातीविरहित शेतीसाठी खताचे व्यवस्थापन कसे करावे (Verticle Farming fertilizer Management)
शेतकरी मित्रांनो हाइड्रोपोनिक्स पद्धतीने उगवलेल्या सर्व झाडांचे किंवा वनस्पतींचे पिकांचे नायट्रोजन, फॉस्फरस तसेच पोटॅशियम ही तीन मुख्य पोषक घटकांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता लागते. याशिवाय सर्व वनस्पतींना कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, मॅगनीज तांबे, जस्त, क्लोरीन, लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता लागते. योग्य प्रमाणात सर्व घटकांचे प्रमाण तुम्ही तुमच्या पिकांवरती देऊ शकता.
या पिकांना तुम्ही थेट पाण्यात देखील वाढवू शकता. परंतु फक्त सर्व आवश्यक द्रव खते देत तुम्ही पिकांची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. परंतु आपल्याला विशिष्ट पिकासाठी योग्य पोषण असलेले उत्पादन खरेदी करावे लागणार आहे. तुम्ही खाद्यपदार्थ वाढवत असाल तर तुम्हाला औषधी वनस्पती साठी तयार केलेले कोणत्याही एका खताची निवड करायची असते. जसे की भाज्या, फळे या पिकांवर चालणारी औषधी तुम्हाला खरेदी करावी लागतील. आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हर्टिकल फार्मिंगचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न मिळवू शकतात.