Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत ई-KYC बंधनकारक! पैसे अडकू नयेत यासाठी लगेच करा ही प्रक्रिया

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 थेट बँक खात्यात दिले जातात. मात्र, हा लाभ नियमित मिळवण्यासाठी ई-KYC पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ई-KYC अपूर्ण असल्यास अर्जाची पडताळणी थांबते आणि महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे अनेक लाभार्थींना हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की आधार व बँक खाते लिंक नसल्यास DBT चा लाभ मिळणार नाही. Ladki Bahin Yojana

महिला नारी शक्ती दूत ॲप, सेतू केंद्र किंवा बँकेच्या माध्यमातून ई-KYC पूर्ण करू शकतात. ई-KYC करताना आधार क्रमांक, OTP पडताळणी आणि काही वेळा Live Photo आवश्यक असतो. तसेच बँक खाते आधारशी लिंक (NPCI Mapping) असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

ई-KYC यशस्वी झाल्यानंतर ॲपमध्ये अर्जाची स्थिती Approved / Verified अशी दिसते आणि पुढील हप्ता थेट खात्यात जमा होतो. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी कोणताही विलंब न करता ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा.Ladki Bahin Yojana

Leave a Comment