Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार…?

Ladaki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील अंतर्गत जानेवारी २०२६ च्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या हप्त्याच्या वितरणात विलंब झाला होता. आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असून, १७ जानेवारी २०२६ पासून महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

सुरुवातीला सरकार डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा एकत्रित ₹३००० हप्ता मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर देणार होते. मात्र, १५ जानेवारी रोजी झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांमुळे निवडणूक आचारसंहिता लागू होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने अ‍ॅडव्हान्स स्वरूपात हप्ता देण्यास परवानगी दिली नाही, आणि वितरण पुढे ढकलण्यात आले.

महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या महिलांना तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना जानेवारी महिन्यात ₹३००० एकत्र मिळण्याची शक्यता आहे. तर नियमित लाभार्थ्यांना ₹१५०० इतका हप्ता मिळेल. हप्ता मिळण्यासाठी e-KYC पूर्ण असणे आणि बँक खाते आधारशी मॅप असणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा पैसे खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते.

Leave a Comment