Ajit Dada Pawar Plane Crash: अजित दादा पवार विमान अपघात मास्टरमाईंड

Ajit Dada Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर वकील नितीन सातपुते यांनी घटनेवर संशय व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

मुंबईहून बारामतीकडे जात असलेले अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाच्या हद्दीत येताच अचानक कोसळले. विमान जमिनीवर आदळल्यानंतर काही क्षणांतच मोठा स्फोट झाला आणि या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेत्याच्या अचानक निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.Ajit Dada Pawar Plane Crash

Ajit Pawar Accident News: बारामती विमान अपघातातील मृतांची नावे

दरम्यान, या अपघातावर प्रतिक्रिया देताना वकील नितीन सातपुते यांनी हा अपघात संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. “या दुर्घटनेमागे केवळ तांत्रिक बिघाड होता की विमान जाणीवपूर्वक नादुरुस्त ठेवण्यात आले होते, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यामागे कोणतेही राजकीय षडयंत्र आहे का, याचाही तपास व्हायला हवा. यासाठी हायकोर्टाचे न्यायाधीश, मानवी हक्क आयोग तसेच सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

1 thought on “Ajit Dada Pawar Plane Crash: अजित दादा पवार विमान अपघात मास्टरमाईंड”

Leave a Comment