Land Records: आता घरबसल्या आपल्या शेतजमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा पहा ऑनलाईन

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Land Records: आता घरबसल्या आपल्या शेतजमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा पहा ऑनलाईन

Land Records : नमस्कार मित्रांनो, सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेलि आहे. ते म्हणजे शेत जमिनीच्या नकाशा बाबत आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या जमिनीचे नकाशे आपल्या घरी बसल्या काढू शकता. आता तुम्ही आता आपल्या मोबाईलवरून शेत जमिनीचे नकाशे मोफत काढू शकता याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की सध्या युगामध्ये आपल्याला सर्व काही ऑनलाईन होताना दिसत आहे. आणि तुम्हाला फक्त गट नंबर टाकून तुम्ही तुमच्या जमिनीचा पूर्ण नकाशा कसा पाहू शकता याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण ब्लॉग मधून जाणून घेणार आहोत.Land Map Online

तुम्हाला तुमची जमीन मोजायची असली तर तुम्हाला आपल्या जमिनीची मोजणी करावी लागते. परंतु आता तुम्हाला मोजणी करण्याची गरज राहिली नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नकाशा द्वारे आपल्या जमिनीची मोजणी करू शकता. आता सरकारने सातबारा 7/12 Utara आणि आठ उतारा सोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात देखील केलेली आहे. आता आपल्याला आपल्या गावाचा शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन मोबाईल द्वारे पाहता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

तुम्हाला ऑनलाईन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी सर्वात अगोदर या वेबसाईट वरती जावे लागणार आहे. नवीन पेज वरती गेल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला एक लोकेशन हा रखाना दिसेल त्या रकान्यात तुमचे राज्य कॅटेगिरी रुलर आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला रुलर हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. आणि तुम्ही जर शहरी भागातील नकाशा पाहणार असाल तर तुम्हाला अर्बन हा पर्याय निवडून ‘पुढे’ वर क्लिक करायचे आहे.

आपला तालुका जिल्हा व गाव निवडून घ्यायचे आहे

यानंतर सर्वात शेवटी व्हिलेज मॅप हे एक नाव दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे.

त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात आहे तेथे त्या गावाचा नकाशा तुमच्या स्क्रीन वरती ओपन होईल

नकाशा ओपन झाल्यानंतर होम पर्याय समोरील आडव्या बटणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकता.

डावीकडील प्लस + किंवा – मायनस या बटणावर क्लिक करून हा नकाशा तुम्ही छोटा किंवा मोठ्या आकारात देखील करू शकता.

त्यानंतर डावीकडे तीन एकाखाली एक आडव्या रेषा दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्या पेजवर माघारी जाण्यासाठी पर्याय असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्वात पहिल्या पानावरती देखील व्हिजिट करू शकता.

तुम्ही गट क्रमांक टाकून देखील आपल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. गट नंबर टाकून तुम्हाला जमिनीचा नकाशा पाहायचा असेल तर तुम्ही (Search By Plot Number) ‘सर्च बाय प्लॉट नंबर’ या नावाने एक रखाना दिसेल इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उतारा यातील गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या जमिनीचा गट नकाशा त्या ठिकाणी ओपन होईल. तुम्ही तुमचा नकाशा मोठा किंवा छोटा देखील करू शकता.

 

खाली क्लिक करून ऑनलाईन सर्वे नंबर जमिनीचे जुने रेकॉर्ड पहा

येथे क्लिक करून जाणून घ्या

खाली नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे ते देखील तुम्हाला कळेल. त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर एकूण किती जमीन आहे. याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. एका गट क्रमांक ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे. त्याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. ही माहिती पाहून झाले की डाव्या बाजूला सर्वात शेवटी ‘मॅप रिपोर्ट’ (Map Report) या नावाचा पर्याय दिसतो त्यावर क्लिक करून तुमच्या जमिनीचा प्लॉट (Land Plot) रिपोर्ट तुमच्यासमोर ओपन होतो.

आपल्या जमिनीचा नकाशा कसा डाऊनलोड करावा?

वरच्या डावीकडील खाली दिशा असलेला डाऊनलोड (Download) एक बाण (Arrow) दिसेल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. त्याखालील तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे गट क्रमांक त्या ठिकाणी दिलेले असतात हे गट क्रमांक नमूद केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. ते देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवर पाहू शकता. या पद्धतीने तुम्ही फक्त आपल्या जमिनीचा गट क्रमांक टाकून आपल्या जमिनीची संपूर्ण माहिती घेऊ शकता.

खाली क्लिक करून ऑनलाईन सर्वे नंबर जमिनीचे जुने रेकॉर्ड पहा

येथे क्लिक करून जाणून घ्या

Leave a Comment